लग्नाच्या अवघ्या १५ दिवसातच पतीने केली पत्नीची हत्या
हत्या करताना पतीने सांगितले कारण तर माहेरच्यांचा वेगळा आरोप, अंजलीसोबत काय घडले?
इंदूर दि १२(प्रतिनिधी)- लग्नानंतर नोकरी गेल्याने पत्नीला कसे संभाळणार या विवंचनेत पतीने पत्नीची आत्महत्या केल्याचा प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूरमधून समोर आला आहे. विशेष म्हणजे दोघांचे लग्न होऊन फक्त १७ दिवसच झाले होते. पण मुलीच्या माहेरच्यांनी मात्र हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
अंजली विक्रम सगोटिया असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर विक्रम सगोटिया असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महू येथील रहिवासी असलेले विक्रम सगोटिया आणि देपालपूर येथील अंजली यांचा २१ मे रोजी विवाह झाला होता. त्याला ५ जून रोजी नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले होते. आता बायकोला कसे सांभाळणार याची त्याला भीती वाटत होती. त्यामुळे विक्रमने अंजलीची हत्या केली. या हल्ल्यात आरोपी विक्रम याच्या हाताला आणि पोटाला दुखापत झाली आहे. आरोपी विक्रमने आपल्या जवाबात मला लग्न करायचे नव्हते. घरच्यांच्या दबावाखाली त्याने लग्न केले. असा दावा केला आहे. तर अंजलीच्या माहेरच्यांनी विक्रमच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाआधी देखील विक्रमच्या वडिलांनी आम्हाला दोन लाख रुपये हुंडा द्याल तरच लग्न होईल, असे सांगितले होते. त्यावेळेस अंजलीच्या घरच्यांनी ती रक्कम दिली होती. पण तरीही तिचा छळ सुरु होता म्हणून घटनेच्या आदल्या दिवशी अंजलीने तिच्या घरच्यांना फोन करून सासरचे लोक त्रास देत असल्याने तुम्ही मला घ्यायला या असे सांगितले होते. त्यामुळे अंजलीचा भाऊ रुपेश तिला आणण्यासाठी निघाला होता पण तिथे पोहोचण्यापूर्वीच विक्रमने अंजलीची हत्या केली होती. शरीरावर जास्त घाव होऊन रक्तस्त्राव झाल्यामुळेच अंजलीचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले आहे.
अंजलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती विक्रम आणि कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पती विक्रम सगोतिया, सासरे महेश, सासू दुर्गा, मेहुणा कृष्णा यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे सतरा दिवसाच्या संसाराची खुनाने अखेर झाली आहे.