‘तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार’
सुप्रिया सुळे यांचा केंद्रातील या मंत्र्याला इशारा, खासदार सुळे कार्याध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच आक्रमक
पुणे दि १३(प्रतिनिधी)- बाहेरून यायचं आणि आमची चेष्ठा करायची, महाराष्ट्रात येऊन हा मिजास दाखवायचा नाही, तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच आक्रमपणे भाजप नेत्याचा समाचार घेतला आहे.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे मागच्या आठवड्यात बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी इंदापुरमध्ये जाऊन जल जीवन मिशनचे उद्धाटन केले होते. मात्र, या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार आणि लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले नव्हते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या ‘तुम्ही बाहेरून येऊन आमची चेष्ठा करणार, हे नाही चालणार. ज्यावेळी पार्लमेंटमध्ये त्यांचा प्रश्न येईल ना त्यावेळी मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार. इथे येऊन मिजास नाही दाखवायचा. इथे मानसन्मान देणार, इथे काही नाही बोलणार. अथिती देवो भवं. तुमचा कार्यक्रम मी पार्लमेंटमध्येच करणार, म्हणजे सगळ्या देशाला समजेल. त्यामुळे इथे येऊन चिखलफेक केली तर त्याला पार्लमेंटमध्ये उत्तर मिळणार. कारण हे मंत्री पार्लमेंटमध्ये खूप चुका करतात, आपण आपले वयाचा मानसन्मान ठेवतो म्हणून काही बोललो नाही.’ पण आता तुमच्या घरात घुसून म्हणजे दिल्लीत कसबे विचारणार असल्याचा इशारा सुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांना दिला आहे.
देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला आहे. कमी मार्काने पास झालो हे कबूल करणारा हा पहिला पक्ष आहे, असे म्हणत जाहिरातीद्वारे महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले असल्याचे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. मविआच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आणि सत्तेत असलेल्या सरकारचे अपयश वर्तमानपत्रातील जाहीरातबाजीवरून दिसते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.