Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडची ही अभिनेत्री गाडीच्या भीषण अपघातात जखमी

अपघातात अभिनेत्रीच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत, म्हणाली अपघातामुळे मला जबर....

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या चर्चेत आहे. रुबिनाच्या गाडीचा अपघात झाला आहे. रुबिनाच्या गाडीला टेम्पोने धडक दिल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या अपघातामुळे रुबिना हिला जबर मानसिक धक्का बसला आहे.


या अपघतासंदर्भात रुबिनाचा पती अभिनेता अभिनव शुक्लाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्याने अपघात झालेल्या गाडीचे फोटो शेयर केले आहेत. तसेच या ट्विटमध्ये त्याने रुबिनाच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. अभिनवने १० जून रोजी ट्विट करत त्याची बायको रुबीना दिलैक हिचा अपघात झाल्याची माहिती दिली. ‘जे आमच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. फोनवर बोलत ट्रॅफिक लाईट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. याबाबत सविस्तर माहिती मी देईनच’. या अपघातावेळी रुबिना गाडीतच होती. पण सध्या ती ठीक आहे. तिला उपचारांसाठी डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो’. अशी माहिती दिली आहे. तर रुबिनाने दुसरे ट्विट करत अपघाता नंतरची आपली स्थिती सांगितली आहे. अपघातामुळे माझी पाठ आणि डोक्याच्या खालच्या भागाला दुखापत झाली आहे. या अपघातामुळे जबर मानसिक धक्का बसला आहे. परंतु मेडिकल टेस्टमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं आलं आहे. बेपर्वाईनं ट्रक चालवणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. परंतु नुकसान झालं आहे. मी सर्वांना विनंती करते की आपली सुरक्षेसाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असे आवाहन या अभिनेत्रीने केले आहे.

रुबीना दिलैक हिनं तिच्या करीअरची सुरुवात छोटी बहू या मालिकेतून केली होती. पण बिग बाॅसचा १४ वा सीझन जिंकत प्रकाशझोतात आली. तसेही तिला शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. खतरों के खिलाडी, झलक दिखला जा या शोमध्ये देखील सहभागी झालेली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!