रुममेटनेच केली तेजस्विनीची चाकु भोसकून हत्या
डाॅक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, कारण अस्पष्ट, पोलीसांनी दिली महत्वाची माहिती
हैदराबाद दि १४(प्रतिनिधी)- हैदराबाद येथील एका २७ वर्षीय तरुणीची लंडन येथे हत्या झाली आहे. ही हत्या तिच्या ब्राझिलियन फ्लॅटमेटने चाकून भोसकून केली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून स्थानिक पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे त्या तरूणीचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न तुटले आहे.
तेजस्विनी रेड्डी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. सुरुवातीला तिची ओळख कोंथम तेजस्विनी अशी सांगण्यात येत होती. ती लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती. गेल्या आठवड्याभरापूर्वीच तीनं राहण्यासाठी एका फ्लॅटची निवड केली होती. या फ्लॅटमध्ये ती इतर काही विद्यार्थी-विद्यार्थींनीसोबत राहत होती. यामध्ये एका ब्राझीलच्या विद्यार्थ्याचा देखील समावेश होता. तेजस्विनीचा चुलत भाऊ विजयने सांगितले की, तेजस्विनी लंडनमधील वेम्बली येथील नील क्रेसेंट परिसरात इतर काही विद्यार्थ्यांसोबत भाड्याच्या घरात राहत होती. सुमारे आठवडाभरापूर्वीच ब्राझिलमधील एक आरोपी तरुण त्यांच्या रुममध्ये शिफ्ट झाला होता. ब्राझीलियन तरूणाने तेजस्वीनीवर चालू हल्ला केला. चाकू हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तेजस्वीनीला एका महिलेने तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलीसांनी एका ब्राझिलियन युवकाला आणि मुलीला अटक केली होती. पण चाैकशीनंतर त्या मुलीला सोडण्यात आले. यानंतर याप्रकरणी आणखी मुलाला अटक करण्यात आली आहे.