
बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही
भाजपा नेत्याकडून एकनाथ शिंदेची बेडकाशी तुलना, शिंदे गट भाजपातील वाद चिघळला, जोरदार टिका
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिंदे गटाने काल सर्व वृत्तपत्रांना दिलेली राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात दिली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण या जाहिरातीत थेट शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षा सरस असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे हा वाद शमण्याएैवजी अधिकचा वाढला आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. बेडूक किती फुकला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात शिंदे गटाला सुनावले आहे. एकप्रकारे त्यांनी एकनाथ शिंदे यांची बेडकाशी तुलना केली आहे. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूलचे चुकीचे सल्ले देत आहे, असं सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोल ही अनिल बोंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भाजप आणि जनतेच मन दुखून स्वतःला पुढे करून चालणार नाही. टिमकी वाजून सल्ले देणारे असतील तर त्यांचं कल्याण होणार नाही, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला आहे. एकंदरीत अनिल बोंडे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ओबीसींचे प्रश्न, मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या भल्याचा विषय, आदिवासी कल्याणाचे काम, अनुसूचित जातीच्या कल्याणाचे काम, दिव्यांगांच्या विकासाचे काम असो सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचे काम हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत. आजच्या घडीला खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस हाच एकमेव चेहरा बहुजनांसाठी काम करणारा असल्याचे देखील खासदार बोंडे म्हणाले आहेत.