पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात काही ठिकाणी मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा मृत अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
वानवडी परिसरातील साळुंखे विहार कचराकुंडीजवळ पुरूष जातीचे मृत अर्भक फेकून दिल्याची घटना गुरुवारी (१५ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असल्याने त्याला फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.
याप्रकरणी पोलीस अमलदार दिनेश जाधव यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळुंखे विहार कचराकुंडीजवळ १५ जून रोजी पुरूष जातीचे अर्भक असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेत ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव तपास करीत आहेत. दरम्यान , गेल्या काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालय परिसरातील कचराकुंडी जवळ मृत अर्भक सापडले होते