Latest Marathi News
Ganesh J GIF

बंगालहून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार

पिंपरी – नोकरीसाठी बंगालवरुन आलेल्या तरुणीचा विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतींसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी पश्‍चिम बंगालमधून आलेल्या एका २८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश्‍वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी कामाच्या शोधात होती. वेबसाइटवरुन तरुणीला एका महिलेचा नंबर मिळाला. त्या महिलेने तरुणीला बॅंकेत नोकरीसाठी इंटरव्यू असल्याचे सांगत पुण्यात बोलविले. नंतर बॅंकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.त्यानंतर ठाकरे यांनी तिला भागीदार चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्‍वरी रेड्डी यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर ठाकरे यांना १५ हजार रुपये दिले. १५ मे रोजी आरोपींच्या पुण्यातील कार्यालयात बोलविले. तिथे ठाकरे यांनी विनयभंग केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर मुख्य आरोपी रेड्डी याने वारंवार पुणे आणि पिंपरी येथील कार्यालयात विनयभंग केला. तर ३ जून रोजी पुण्यातील कार्यालयात बाथरूममध्ये जाऊन रेड्डी याने तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकारानंतर पीडित मुलगी जाऊ लागली असता महिला आरोपीने तिला अडविले.

आम्ही देखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असे सांगितले. त्यानंतर चिरागउद्दीन तिथे आला व त्याने पिस्टलाचा धाक दाखवून धमकावले. ४ जून रोजी रेड्डी याने तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्‍लील चाळे दाखविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अर्जुन ठाकरे म्हणाले, मी किंवा आमच्यापैकी कुणीही कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!