मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे वडिलांकडून मुलीचा खून
अल्पवयीन मुलगी हट्टला पेटली, आई वडीलांनीही बजावले, वडिलांचे टोकाचे पाऊल
सांगली दि ५(प्रतिनिधी)- मुलीच्या प्रेम प्रकरणुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणास चिडून वडिलांनी स्वयंपाक घरातल्या चाकूने मुलीचा खून केल्याची घटना खानापूर येथील मंगरूळ येथे घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
श्रेया संतोष जाधव असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर संतोष जगन्नाथ जाधव असे हत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. श्रेयाचे नात्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला वडिलांचा त्याला विरोध होता. त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते. घटनेच्या दिवशी श्रेया कॉलेज ला जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र वडिलांनी तिला संबंधीत मुलाशी न भेटण्याची अट घातली होती. यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया, असे सांगितले. मात्र श्रेया काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या संतोष याने श्रेयाच्या छातीवर डाव्या बाजूला भाजी कापण्याच्या चाकूने वार केला. या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली. विटा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर वडील संतोष व तिच्या अन्य नातेवाईकांनी श्रेयाने आत्महत्या केल्याचा बनाव केला. पण अखेर तो बनाव फसला अणि खून उघड झाला.
पोलिसांनी संतोष जाधव याची रविवारी कसून चौकशी केली. त्याने श्रेयाला चाकूने भोसकून ठार मारल्याची कबुली दिली. किरण जाधव हिने विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.