Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपा नेत्याने केली आदिवासी मजुराच्या तोंडावर लघुशंका

लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल, आरोपी अटकेत, मुख्यमंत्री म्हणतात आरोपीला पक्ष...

भोपाळ दि ५(प्रतिनिधी)- मध्यप्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारण त्या ठिकाणी भाजपा नेत्याने एक आदिवासी मजुरावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेश मधील सिधी जिल्ह्यातील कुब्री गावात ही घटना घडली आहे. प्रवीण शुक्ला असे त्या भाजपा नेत्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरूण गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका करत आहेत. त्यावेळी तो मजूर शांत बसला आहे. तर त्या तरुणाच्या मित्रांनी हा व्हिडिओ शुट केला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा आहे. तो मजुरीचे काम करतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात सिधी येथील स्थानिक पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम २९४ आणि ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. यावरून तिथे राजकारण रंगले आहे.

या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपीला कोणताही धर्म, जात किंवा पक्ष नसतो. आरोपी हा आरोपी असतो. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!