Latest Marathi News

बाॅलीवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली होती भीक मागण्याची वेळ

अभिनेत्रीने सांगितला भीक मागण्याचा प्रसंग, हाॅटेलबाहेर भीक मागताना म्हणाली होती मला भुक...

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री अलीकडे प्रत्येक चित्रपटासाठी तगडे मानधन घेत असतात. पण सध्या एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. मुंबईतील एका ५ स्टार हॉटेल बाहेर भीक मागण्याची वेळ आली होती असा गाैप्यस्फोट अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्री विद्या बालन सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, आमचा आयएमजी म्हणजेच इंडियन म्युझिक ग्रुप होता. हा ग्रुप दरवर्षी इंडियन क्लासिक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करायचा. हा कॉन्सर्ट तीन दिवसांचा असायचा. संपूर्ण रात्रभर हा कॉन्सर्ट चालायचा. मी याच्या ऑर्गनाइजिंग कमिटीमध्ये होते. मी एक वॉलेनटिअर म्हणून काम करायचे. कार्यक्रमाच्या आयोजनात आम्ही मदत करायचो आणि रात्री शो संपला की नरिमन पॉइंटवर फिरायला जायचो. एकदा मला एका मित्रानं एक चॅलेंज दिलं. त्याने मला भर रात्री ओबेरॉय- द पाम्स या कॉफी शॉपचं दार वाजवायला सांगितलं आणि काहीतरी खायला मागायला संगीतलं. मी एक अभिनेत्री होते हे त्यांना माहित नव्हतं. मी दरवाजा सतत ठोठावू लागले. तिथले सर्व लोकं चिडू लागले. मी खूप वेळा दरवाजा ठोठावला. त्यानंतर मी म्हणाले की, ‘प्लीज, मला भूक लागली आहे. मी कालपासून काही खाल्लं नाही.’ हे पाहून, माझ्या मित्रांना लाज वाटायला लागली. त्यांनी मला परत बोलवून घेतलं. अशाप्रकारे मी हे चॅलेंज जिंकलं होतं. असा खुलासा विद्याने केला. “हे चॅलेंज जिम जॅम बिस्किटसाठी लावण्यात आलं होतं. कॉन्सर्टसाठी आमचा स्पॉन्सर ब्रिटानिया होता. आमच्याकडं खूप बिस्किट होती. परंतु मी मित्रांना सांगितलं होत की, जर मी चॅलेंज जिंकलं, तर मला जिम जॅमचं अधिकच पॅकेट मिळेल. आणि ते मला मिळालं होतं” असेही विद्या म्हणाली.

विद्या बालन ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विद्या बालन ही सध्या तिच्या आगामी नीयत या चित्रपटात व्यस्त आहे. नीयत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विद्या बालन ही दिसत आहे. या सिनेमात विद्यासोबत राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपन्निता शर्मा आणि निक्की वालिया ही स्टारकास्ट झळकणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!