महाराष्ट्रात या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार ठरले?
भाजपाकडून मिशन ४५ ची सुरूवात, अनेक बड्या नेत्यांना लोकसभेचे तिकीट, लोकसभा रणधुमाळीला सुरवात
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- देशातील विधानसभा निवडणुका हळूहळू जवळ येत आहेत. सर्व पक्षाकडून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच मिशन ४५ चे लक्ष घेऊन महाराष्ट्रात तयारी सुरु करणाऱ्या भाजपाने लोकसभेच्या काही जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर यावेळी भाजपा राज्यातील मात्तबर आणि मंत्रीपदी असलेल्या नेत्यांनाही लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाने महाराष्ट्रात विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री भेटी देत असून त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अर्थात भाजपाचे नेते सर्वच मतदारसंघात भेट देत आहेत. पण भाजपा स्वतः किती जागा लढवणार आणि मित्रपक्षांना किती जागा सोडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार, रावेरमधून गिरीश महाजन, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रविंद्र चव्हाण, आणि दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी भाजपाला आपल्या मित्रपक्षाबरोबर वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. मध्यंतरी जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दाैरा केला होता. त्यावेळी काही जागांवर उमेदवार निश्चित केल्याची चर्चा आहे. आता हेच उमेदवार राहणार की बदलणार हे पहावे लागणार आहे.
निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक खासदारांची गेल्या पाच वर्षाची कामगिरी पाहूनच तिकिट देणार आहे. काही दिवसाताच नावांवर चर्चा होईल आणि यादी जाहीर करण्यात येणार आहे. पण हे करत असताना भाजपाला आपल्या मित्रपक्षासोबत चर्चा करावी लागणार आहे. कारण हिंगोली, पालघर, दक्षिण मुंबई बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. तेथे मित्रपक्षाचे खासदार आहेत.