Latest Marathi News
Ganesh J GIF

नृत्यांगना गाैतमी पाटील विरोधात या कारणाने गुन्हा दाखल

गाैतमी आणि वादाची मालिका संपेना, या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, चाहते काळजीत, प्रकरण काय?

अ.नगर दि २९(प्रतिनिधी)- अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारी नृत्यांगना सबसे कातील गाैतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिचा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण ठरलेले असते. पण आता ती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कारण नृत्यांगना गौतमी पाटीलवर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गाैतमीचे चाहते अडचणीत आहेत.

गौतमी पाटील हिने नियमांचे उल्लंघन केले म्हणून तिच्यासह नगरमधील दोन गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आज तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड भागात २८ सप्टेंबर रोजी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पोलीसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पण तरीही हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता पोलीसांनी गौतमी पाटील, गौतमी पाटील हिचे स्वीय सहाय्यक अशोक खरात यांच्यासह मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर रस्त्यात अडथळा निर्माण होईल कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करणे यावरून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गौतमी पाटील हिच्यावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या जून महिन्यापासून गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद पडले होते. मात्र दहीहंडीनंतर पुन्हा गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अद्याप गाैतमीने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसरीकडे दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला होता. याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिका-यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान काॅंग्रेसने यावरून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!