शरद पवारांची ती विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच!
महाराष्ट्र भाजपाचा चिमटा, प्रदेशाध्यक्षांचा सांगली लोकसभा मतदारसंघ प्रवास, पदाधिकाऱ्यांशी संवाद
सांगली दि ५(प्रतिनिधी)- शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला.
सांगली लोकसभा प्रवासात कराड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, महायुतीत भाजपा हा मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात वावगे काहीच नाही, असे बावनकुळे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार शक्य
सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे झाले तर १४-१५ मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल. योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नियुक्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना साईड पोस्टिंग दिली, त्यांच्यावर खटले भरण्या आले. त्यापेक्षा महायुती सरकारने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये क्लिनचिट मिळाली आहे, त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. असे बावनकुळे म्हणाले आहेत.
धार्मिक स्थळे मंदिर, मशीद किंवा बौद्ध विहारांना लष्कराच्या ताब्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्या धार्मिक भावना वेगळ्या आहेत, अधिष्ठान वेगळे आहे. त्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.