Latest Marathi News
Ganesh J GIF

भयंकर! पुण्यात भरदिवसा तरूणावर हत्याराने हल्ला करत खून

थरारक हत्येचा सीसीटीव्ही समोर, आंदेकर टोळीतील सहा जणांना बेड्या, जुना वाद कारणीभूत

पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापुर्वीच पुण्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेला आठवडा होत नाही तोच आणखी एका व्यक्तीचा खून झाला आहे. टोळीवादातून हा खून झाला असल्याचे सांगितले जात आहे. पण या हत्याकांडाने पुण्यातील नागरिक सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निखील सखाराम आखाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नातेवाईकाकडे आले असताना हा खुन झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिबेवाडी आणि धनकवडी भागात राहणारे २ तरुण तीन दिवसांपूर्वी पुण्यातील नाना पेठेतील नातेवाईकांकडे आले होते. यावेळी पेठेतील काही तरूणांशी त्यांचा बघण्यावरून वाद झाला होता. तसेच दीड महिन्यापूर्वीही त्यांच्यात असाच वाद झाला होता. दरम्यान आज हे दोघेही या भागात येत असल्याची माहिती संबंधित तरुणांना मिळाली. त्या भागात राहत असलेल्या तरुणांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती. ते दोघेही एकत्र जेव्हा नातावाईकांच्या घरातून बाहेर आले. तीच संधी साधत टोळक्याने त्या दोघांवर हातोडी आणि स्क्रीवड्रायवरने हल्ला केला. या हल्ल्यात निखील सखाराम आखाडे याच्या मेंदूला जबर मार लागला होता. यातच त्याचा मृत्यू झाला. तर अनिकेत दूधभाते याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात भरदिवसा घडलेल्या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे. दरम्यान पोलीसांनी सूर्यकांत उर्फ बंडु आण्णा राणोजी आंदेकर, मुलगा कृष्णराज उर्फ कृष्णा सुर्यकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर, स्वराज निलंजय वाडेकर यांना अटक केली आहे. तर ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर अमीर आसीर खान हा फरार आहे. तो तडीपार असतानाही पुण्यात आला होता. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नाना पेठेतील आंदेकर टोळी आणि ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. दरम्यान समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ माने यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!