बाॅलीवूडमधील या अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
अभिताभ बच्चनही व्हायरल व्हिडिओवर संतापले, भारत सरकारही कारवाई करणार, नेमके काय आहे या व्हायरल व्हिडीओत
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- आजचा जमाना तंत्रज्ञानाचा आहे. अनेक अशक्य गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. त्यातच आता नवीन आलेले चॅट जीटीपी आणि एएल तंत्रज्ञानाने तर कमालच केली आहे. पण या तंत्रज्ञानाचे काही वाईट म्हणजेच दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आणि अशाच एका आधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाचा फटका बाॅलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला बसला आहे. त्यामुळे बाॅलीवूड बरोबरच भारत सरकार देखील चिंतेत आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या व्हायरल होणाऱ्या फेक व्हिडीओमुळे मोठी खळबळ निर्माण झाली. अनेकांनी यावर थेट संताप हा व्यक्त केलाय. अमिताभ बच्चन यांनी देखील घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडीओ AI च्या मदतीनं तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पत्रकार आणि रिसर्चर अभिषेक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रश्मिका मंदाना आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर उत्सुकतेनं ती लिफ्टमध्ये घुसताना दिसते. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती रश्मिका आहे असे वाटले, मात्र ती रश्मिका नाही. या व्हिडीओत दिसणार मुलगी ही जारा पटेल आहे. नवीनच आलेल्या डीपफेकच्या साहाय्याने जाराच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ खरा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे खरा व्हिडीओ कोणता आणि खोटा हे कळत नाही आहे. मात्र, अभिषेक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जारा पटेलचा खरा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रश्मिकाचा हा फेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियालर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रश्मिकाने देखील या व्हिडिओवर चिंता व्यक्त केली आहे. आज, एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून मी माझं कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांची आभारी आहे जे माझं संरक्षण आणि सपोर्ट सिस्टीम आहेत. पण जर मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत असं काही घडलं असतं, तर मी खरोखर हे करू शकले नसते. कल्पना करू शकत नाही की, मी हे कसं हाताळू शकले असते त्यावेळी. आणखी कोणी या खोट्या प्रकरणाचा शिकार होईल, त्याआधी आपण एक समाज म्हणून यावर बोलायला हवं.” असे मत रश्मिकाने मांडले आहे.
🚨 There is an urgent need for a legal and regulatory framework to deal with deepfake in India.
You might have seen this viral video of actress Rashmika Mandanna on Instagram. But wait, this is a deepfake video of Zara Patel.
This thread contains the actual video. (1/3) pic.twitter.com/SidP1Xa4sT
— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023
अभिताभ बच्चन यांनी देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे. कोणीही एखाद्याच्या फोटोचा अशा प्रकारे गैरवापर करणं वाईट आहे. असे व्हिडीओ एडीट करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान रश्मिका मंदानाचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.