Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात नवविवाहित दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह

दोन दिवसांपासून बंद दरवाजा उघडताच सगळेच हादरले, हत्या की आत्महत्या अजूनही गुलदस्त्यात, पुण्यात कुठे घडली घटना?

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुण्यात मागील काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. आताही पुण्यातीव लोहगाव परिसरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे. हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

किरण बोबडे आणि आरती बोबडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास येथील लोहगाव वडगाव शिंदे रोड लेक व्हिव सिटी या सोसायटीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बोबडे राहत असलेल्या घरातून वास येत असल्याचे घरमालक प्रशांत यादव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी फोन करुन याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत मिळून आली. पोलीसांनी चाैकशी केली असता, शनिवारी सकाळपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यामुळे अंदाजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या. त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत खुलासा होईल.

किरण हा पोस्टात कंत्राटी नोकरी करत होता. तो मुळचा माजलगाव बीड येथील आहे. तर पत्नी आरती ही येरवड्यातील असून एका खासगी बँकेत नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी आले होते. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!