प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला लग्नासाठी प्रपोज
अभिनेत्रीची सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल, क्रिकेटरची दुसरी पत्नी होण्यास तयार, ठेवली विचित्र अट, वाचा नेमके प्रकरण काय?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत आहे. शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट फॉर्म हे भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. पण शमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. एकीकडे त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाची चर्चा होत असताना दुसरीकडे एका लोकप्रिय अभिनेत्रीला त्याला थेट लग्नासाठी प्रपोज केले आहे. याची जोरदार चर्चा सगळीकडे होत आहे.
मोहम्मद शमी ज्या प्रकारे कामगिरी करत आहे. ते पाहता अनेकजण शमीचे फॅन झाले आहेत. याचबरोबर साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोष सध्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची जबरा फॅन झाली आहे.तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज केले आहे. पण तिने यासाठी एक विचित्र अट ठेवली आहे. त्याची सुद्धा जोरदार चर्चा होत आहे. पायल घोषने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत शमीला प्रपोज केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.’ यासोबतच तिने या पोस्टमध्ये हास्याचा इमोजीही शेअर केला आहे. पायलच्या लग्नाच्या प्रस्तावावर शमीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि येत्या काही दिवसांत तो यावर काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुसरीकडे शमीची पहिली पत्नी हसीन जहाँने पतीच्या यशावर अजब विधान केले आहे. मी क्रिकेटची फॅन नाही. काहीही झाले तरी, जर तो चांगली कामगिरी करत असेल, तर भारतीय संघात राहतील आणि चांगली कमाई करतील, ते आमचे भविष्य सुरक्षित करेल. मोहम्मद शामी चांगली कामगिरी करत आहे. चांगला खेळला नाही तर तो संघात राहणार नाही. पण चांगला खेळला तर संघात राहील. त्याशिवाय तो चांगली कमाईही करेल. त्यामुळे आमचे भविष्य सुरक्षित होईल, असे हसीन शहाँ म्हणाली. त्याशिवाय, मी टीम इंडियाला माझ्या शुभेच्छा देईन पण शमीला नाही. असे देखील हसीन म्हणाली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर जोरदार टिका होत आहे.
#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you 🤣🤣
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 2, 2023
पायल घोष हिचा जन्म कोलकाता येथे १९९२ मध्ये झाला आहे. तिने आपले शिक्षण सेंट पॉल मिशन स्कूलमधून केले आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समधून पदवीचे शिक्षण घेतले. तिने अभिनयात कारकीर्द घडवण्यासाठी कॉलेजमध्ये असतानाच घरून पळून मुंबईत आली होती. त्यानंतर तिची अभिनय कारकीर्द सुरू झाली होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.