थरारक! पुण्यात या मार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, अपघातात अनेकजण जखमी, वाहनावरील नियंत्रण सुटले आणि....
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. घटनेचा थरारक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका भरधाव टेम्पोने चार ते पाच वाहनांना उडवले आहे. एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मुळशी तालुक्यातील पुणे – कोलाड महामार्गावर हा अपघात झाला.
याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात हा भीषण अपघात झाला. या मार्गावरील एका उतारावर भरधाव वेगात असलेल्या टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने त्याने या मार्गावरील अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत पाच ते सहा नागरीक गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून टेम्पो अत्यंत वेगात येऊन त्याने एकामागे एक वाहनांना धडक देत नुकसान केले आहे. दरम्यान या ठिकाणी उतारावर अपघात रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना प्रशासनाकडून होत नाही. दर आठवड्यात या ठिकाणी अपघात होत असतो. मागील आठवड्यात देखील या ठिकाणी अपघात झाला होता.
पिरंगुट घाटात सातत्याने अपघात होतात. परंतु अपघात रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन कोणत्याच उपाययोजना करत नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. दरम्यान नागरिकांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांना निवेदन दिले असून या मार्गावर सुरक्षा उपाय योजना करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.