Latest Marathi News
Ganesh J GIF

मोहित कंबोज यांचा ट्विट करत राष्ट्रवादीला इशारा

भाजपच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीचा गोटात धाकधूक

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीच्या नेत्याला इशारा दिलस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असं टि्वट केलं होत. आता पुन्हा टि्वट केल्याने खळबळ उडाली आहे.

आजच्या ट्विट मध्ये कंबोज यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचा अभ्यास करत असल्याचा इशारा त्यांनी पवारांना दिला आहे.”बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे,” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.रोहित पवार यांनी कंबोज यांच्या यापूर्वीच्या टि्वटला उत्तर दिले आहे. त्यानंतर हे ट्विट करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीवर ट्विट करत कंबोज यांनी हल्लाबोल केला होता. त्यावेळी इतर भाजप नेत्यांनी त्याचे समर्थन केले होते आता थेट रोहित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे. त्याचबरोबर आगामी काळात भाजप राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!