Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेना एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार

उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारविरोधात आणखी रणनीती

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार काढत शिंदे गटाची कोंडी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे सामना रंगणार आहेत.

शिवसेना गणेशोत्सवानंतर राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवरच या यात्रेचा श्रीगणेशा होणार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेने या यात्रेला सुरूवात होणार आहे.त्यामुळे न्यायालयात सुरु असलेली शिवसेनेची लढाई आता मैदानातही होणार आहे. उद्धव ठाकरेच सभा घेणार असल्याने शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनीही राज्यभरात निष्ठा यात्रा काढत बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेतल्या होत्या. आता पुन्हा शिवसेनेने दौरा सुरू केला आहे. त्यामुळे आता पुन्हा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने सामने येणार आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता महाप्रबोधन यात्रा सुरु होणार असल्याने शिंदे गटाची चिंता वाढली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!