
नवी दिल्ली – देशभरात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेतील जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. देशातल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागा भरण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले.
राज्यसभेतील ५० सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त झाले असून इतर सहा सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त झाले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमधून हे सदस्य निवृत्त होत आहेत.विविध राज्यांतील पक्षीय संख्याबळानुसार या जागांवर सदस्य विजयी होत असतात. आता बिहारमध्ये राजकीय समिकरण बदलल्याने त्याचा भाजपला लाभ होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या आधीच या निवडणुकीद्वारे देशातल्या राजकीय सिस्टीमवर आपलेच प्रभुत्व आहे असे वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपला याचा लाभ उठवता येऊ शकतो असेही भाकीत आहे.