Latest Marathi News
Ganesh J GIF

सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या – रमेश पिस्के

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील एका मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास शासनाने कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी व सदर प्रकरण शासनामार्फत फास्टट्रॅक न्यायालयात चालवावेत या मागणी करिता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहरातील हिंदू खाटीक बांधव रस्त्यावर उतरलाय . त्या पीडित कुटुंबीयास न्याय मिळावं अन्यथा हिंदू खाटीक बांधवांच्या वतीने शासन व प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करू असा संतप्त जनक इशारा नळदुर्ग येथील हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष रमेश पिसके यांनी केला.

या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर व परिसरातील हिंदू खाटीक समाज बांधवांच्या वतीने नळदुर्ग शहरातून मूक मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला . शासनाने सदर प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदू खाटीक समाजाच्या वतीने करण्यात आले . वलांडी तालुका देऊणी जिल्हा लातूर येथील आत्याचार केलेला हा नराधम वलांडी येथील हिंदू खाटीक समाजातील एका मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे . पीडित कुटुंब आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे आरोपीच्या कुटुंबीयांकडून पीडित कुटुंबास त्रास होईल त्यामुळे त्यांची सोय इतर ठिकाणी करून त्यांना पोलीस सुरक्षा द्यावी व पीडित कुटुंबीयास आर्थिक मदत करावी पीडित अल्पवयीन मुलीचे पुनर्वेशन व शिक्षणाचा पुर्ण खर्च शासनाने करावा अशी माहिती हिंदू खाटीक संघटनेचे नळदुर्ग शहराध्यक्ष रमेश पिसके यांनी बोलताना माहिती दिली

तसेच याप्रकरणी नळदुर्ग शहर व परिसरातील हिंदू खाटीक बांधवांनी विविध मागणीचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांना देवून संबंधित त्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली . यावेळी हिंदू खाटीक समाज नळदुर्ग शहराध्यक्ष रमेश पिसके , उपाध्यक्ष श्याम कनकधर , सचिव शिवाजी कनकधर , शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण , सरदारसिंह ठाकुर , शहराध्यक्ष संतोष पुदाले शाहपुर येथील हिन्दु खाटीक संघटनेचे अध्यक्ष नागनाथ प्रभाकर कांबळे ,बबन कांबळे, मारुती कांबळे,सुनिल कांबळे सह हिंदू खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!