Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपचे मुरलीधर मोहोळ,कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर की मनसेचे वसंत मोरे ? लोकसभेत पुणेकरांची पहिली पसंती कुणाला ?

देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी आणि सर्वात जुने शहर म्हणजे पुणे,महाराष्टाच्या सांस्कृतिक विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योग, शिक्षण, शहरी विकास प्रत्येक बाबतीत पुण्याची गणना देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये केली जाते. देशातील सर्वात मोठ्या आयटी हब असलेले हे शहर.त्यामुळेच देशाचे लक्ष ज्याप्रमाणे मुंबई वेधून घेत त्याचप्रमाणे पुणेही लोकांना आपल्यकडे आकर्षित करून घेते. ब्राम्हण, मराठे, दलित यांचे संमिश्रण असणारे पुणे. म्हणूनच पुण्यातून उमेदवारी  द्यायची झाल्यास त्यासाठी अनेक  निकष ठरविले जातात. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याची उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरु झाली.

पुणे लोकसभेत कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे उमेदवार विजयी होत आले आहेत.2019  च्या निवडणुकीत निवडून आलेले भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा अद्याप रिक्त आहे. याच जागेवर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मनसेचे वसंत मोरे आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांनी कंबर कसायला सुरवात केली आहे. 2004 आणि 2009 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले होते.2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे तर 2019 मध्ये भाजपचेच गिरीश बापट विजयी झाले. काँग्रेसचे मोहन जोशी यांचा बापट यांनी दुप्पट मतांनी पराभव केला होता. परंतु,29 मार्च 2023  रोजी गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त जागेवर यावेळी कोणता पक्षाने कुणाला उमेदवारी देणार हे पाहणे मनोरंजक असेल. भाजपच्या बाजूने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे नाव चर्चेत आहे.हा तरुण मराठा चेहरा आहे. लोकांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. तर, जगदीश मुळीक यांचे नाव चर्चेत आहे. पुण्यातील पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून ते परिचित आहेत. आक्रमक वृत्ती साठी ते ओळखले जाते. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे ही तांच्या जमेची बाजू आहे. 

भाजपचे असे तीन चेहरे चर्चेत असले तरी कॉंग्रेसही त्यात मागे नाही.गेल्यावेळी लोकसभा निवडणूक लढविणारे काँग्रेसचे मोहन जोशी यावेळीही पुन्हा रेसमध्ये उतरले आहेत. पुण्यातील काँग्रेसचा हा जुना चेहरा आहे. त्याचसोबत कसबा येथील पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाले आमदार रवींद्र धंगेकर ही नावदेखील रेसमध्ये आहेत. कॉंग्रेसचा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय ऐतिहासिक ठरला. कारण, ही जागा 1995 पासून भाजपच्या ताब्यात होती

 भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात पुणे लोकसभेसाठी चुरस होईल अशी अपेक्षा असतानाच मनसेचे वसंत मोरे यांनीही या रिंगणात उडी घेतली. वसंत मोरे यांची मनसेचे फायर ब्रॅंड नेते म्हणून ओळख आहे. मनसेचे माजी नगरसेवक असलेले मोरे यांनी प्रभागात अनेक चांगली कामे केली. मनसेचे पुणे शहराचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे पुणेकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!