Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारमधील मंत्र्यांना मिळाला निवारा

पहा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला संपुर्ण यादी

मुंबई दि २३(मुंबई)- शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण आज त्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यात आलेले नाहीत. पण हळूहळू सरकार पुढ जात असून बहुतेक नव्या मंत्र्यांना सीफेसवर बंगले देण्यात आले आहेत.

सरकार स्थापनेपासून होत असलेल्या दिरंगाईवरुनही शिंदे सरकारवर विरोधकांनी टिका केली होती. मात्र, हळु हळु शिंदे सरकारची घडी बसत आहे. आज शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्याना बंगल्यांचेह वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार, मंत्री उदय सामंत यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर संजय राठोड यांना शिवनेरी बंगला मिळाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला तर दिपक केसरकर यांना रामटेक बंगला मिळाला आहे. अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड (ब7) तर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लोहगड बंगल्याची चावी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना रायलस्टोन बंगला देण्यात आला आहे. तर दादा भुसे आणि तानाजी सावंत यांना अद्याप बंगल्याचे वाटप करण्यात आलेले नाही.

पहा मंत्री आणि त्यांना दिलेले बंगले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर- शिवगिरी बंगला

१)राधाकृष्ण विखे-पाटील – राॅयलस्टोन
२)सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी
३) चंद्रकांत पाटील- (अ९)लोहगड
४) डॉ. विजयकुमार गावित-चित्रकुट
५) गिरीष महाजन- सेवासदन
६) मंगलप्रभात लोढा- (ब१)सिंहगड
७)सुरेश खाडे- ज्ञानेश्वरी
८)रवींद्र चव्हाण – (अ६)रायगड
९)अतुल सावे-(अ३)शिवगड
१०)गुलाबराव पाटील-जेतवन
११)संजय राठोड- शिवनेरी
१२)संदीपान भुमरे- (ब२)रत्नसिंधू
१३)उदय सामंत- मुक्तगिरी
१४)अब्दुल सत्तार- (ब ७)पन्हाळगड
१५)दीपक केसरकर- रामटेक
१६)शंभूराज देसाई-(ब४)पावनगड

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!