
बच्चू कडू म्हणजे बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या
बच्चू कडू यांच्यावर या भाजपा आमदाराची जिव्हारी लागणारी टिका
अमरावती दि २४(प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत.पण आता त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले आमदार रवी राणा यांनी निशाना साधला आहे.. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… ही कडू यांची वृत्ती असल्याचा टोला राणा यांनी लगावला आहे.
रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा हे एका कार्यक्रमासाठी बच्चू कडू यांच्या मतदारसंघात आले होते. यावेळी रवी राणा म्हणाले की, ‘बच्चू कडू हे केवळ पैशांच्या पाठी धावणारे आमदार आहेत. मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदारसंघाच्या आमदारचं स्लोगन आहे. काय आहे स्लोगन… ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… रुपये आणायला गुवाहटीला जायला लागते ना, २० वर्षांपासून फाटकी झोळी दाखवून या मतदारसंघातील आमदारांनी बॅगा भरल्या. भावनेचे राजकारण करत, खोटं बोला पण रेटून बोला, या प्रकारे त्यांनी जनतेची दिशाभूल केली. या ठिकाणी कुठलाही मोठा प्रकल्प आला नाही. अचलपूर जिल्ह्याची मागणी आम्ही पूर्ण करू असे म्हणत आगामी निवडणुकीत बच्चू कडू यांना आव्हान देण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे.नवनीत राणा यांनी देखील यावेळी बच्चू कडू यांच्यावर टिका केली आहे.
भाजपाने शिंदे गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे.तरीही बच्चू कडू यांच्या मतदारसंघातच त्यांच्यावरच टीका करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.आता बच्चू कडू या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.