Just another WordPress site

‘या’ पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गटात थेट लढत

शिंदे गटाकडून उमेदवाराची घोषणा तर शिवसेनेचे वेट अँड वाॅच

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वरचढ कोण हे ठरवणारी राजकीय लढत लवकरच होणार आहे. शिवसेनेची ताकत असलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असून ही जागा शिंदे गट लढवणार आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याचाही फैसला या निमित्ताने होणार आहे.

GIF Advt

अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा थेट सामना होण्याची शक्यता आहे. ही जागा भाजप शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा आहे. तसेच, इथून मुरजी पटेलांचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेकडून अद्याप कोणत्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.सहानभूतीचा फायदा मिळवण्यासाठी लटके कुटुंबातील एकाला शिवसेना संधी देण्याची जास्त शक्यता आहे. मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली होती.पण ती निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवल्या जातात त्यामुळे ही पोटनिवडणुक दोघांना आपले अस्तित्व दाखवणारी ठरणार आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं मे महिन्यात कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे रमेश लटके यांचं निधन झालं होतं. रमेश लटके यांच्या निधनानंतर आता या ठिकाणी निवडणूक होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!