Latest Marathi News
Ganesh J GIF

माढ्यातुन अनिकेत देशमुखांनी अपक्ष भरला अर्ज; धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच माढा लोकसभेतून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आहे.त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे.तर महाविकास आघाडीत असलेल्या शेकापचे नेते अनिकेत देशमुख यांनी देखील अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्यानंतर शेकापचे अनिकेत देशमुख यांनीे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ते म्हणाले की, चर्चेला आम्ही पाठिंबा दिला हे म्हणणं योग्य राहणार नाही. आम्ही दुधखुळे नाहीत. माढा मतदारसंघातील या सर्व घडामोडीत आमचा वापर करण्यात आला असं माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रत्येकवेळी एकंदरीत सगळ्यांना अंधारात ठेवून या गोष्टी घडल्या आहेत. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे. यापुढे अशी चुक होणार नाहीत. असंही अनिकेत देशमुख यांनी म्हटलं.

तसेच महाविकास आघाडीत असल्याने आम्हाला तुमच्याबद्दल चर्चा करायची आहे. असं सांगितले, तेव्हा आम्ही माढ्यातील बैठकीत गेलो. त्या चर्चेत आम्हाला सांगितले एक आणि बैठकीते दुसरेच ठरले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करूने सर्वांचं एकमत झाल्यास उद्या सकाळी आम्ही अर्ज भरणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलंय.

दिवंगत आमदार गणपत देशमुख यांचे नातू असलेले अनिकेत देशमुख हे शेकापचे युवा नेते आहेत. २०१९ च्या सांगोला विधानसभेतून अनिकेत यांचा अवघ्या ७०० मतांनी पराभव केला होता. यातच आता अनिकेत देशमुखांनी लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर माढा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही केली होती. मात्र शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!