Latest Marathi News
Ganesh J GIF

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय कर्ज ;पाहा सुप्रिया सुळे यांची संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून (19 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशातील इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रातदेखील निवडणुकीचा धुरळा उडतो आहे.त्यातही महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबीयातील दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. नणंद-भावजयीच्या लढतीच्या निकालाचा शरद पवार, अजित पवार आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यातून संपत्तीची माहिती उमेदवारांनी जाहीर करायची असते.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनीही प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्तीची माहिती जाहीर केली आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील संपत्ती प्रतिज्ञपत्राद्वारे समोर आली आहे. यातून त्यांच्या एकूण संपत्तीचे विवरण देण्यात आलं आहे.या प्रतिज्ञापत्रातून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांकडून कर्ज घेतलं आहे.सुप्रिया यांनी सुनेत्रा पवारांकडून 35 लाखाचं कर्ज घेतलं आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडूनदेखील सुप्रिया सुळे यांनी 20 लाखाचं कर्ज घेतलं आहे. म्हणजेच अजित पवार कुटुंबीयांकडून सुप्रिया सुळे यांनी एकूण 55 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे.निवडणुकीच्या रिंगणात नणंद-भावजयी एकमेकांविरोधात पूर्ण तयारीने उतरलेल्या असतानाच नणंदेने भावजयीकडूनच घेतलेल्या कर्जाच्या रकमेमुळे या निवडणुकीच्या वातावरणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी 6 लाख 48 हजार 431 रुपये आहे. तर त्यांचे सदानंद सुळे यांची एकूण संपत्ती 1 अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये आहे.सुप्रिया सुळे यांच्या स्थावर मालमत्तेचं मूल्य 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये असून सदानंद सुळे यांच्या स्थावर मालमत्तेचं मूल्य 4 कोटी 66 लाख 26 हजार 94 रुपये इतकं आहे. सुप्रिया सुळे यांची वारसाप्राप्त मालमत्ता 7 कोटी 19 लाख 84 हजार 336 रुपयांची आहे.त्यांची सात बॅंकांमध्ये खाती असून 29 फेब्रुवारी 2024 अखेर त्यात एकूण 1 कोटी 32 लाख 43 हजार 313 रुपयांची रक्कम होती. तर त्याव्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांच्या बॅंकेत एकूण 10 कोटी 50 लाख 85 हजार 882 रुपयांच्या ठेवी आहेत. म्हणजेच बॅंकांमध्ये असणारी सुप्रिया सुळे यांची एकूण रक्कम तब्बल 11 कोटी 83 लाख 29 हजार 195 रुपये इतकी आहे.सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण 14 कोटी 39 लाख 82 हजार 347 मूल्याचे शेअर्स आहेत. तर 2 कोटी 4 लाख 41 हजार 793 रुपयांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याकडे 3 कोटी 50 लाख 86 हजार 80 रुपयांच्या खासगी कंपनीत ठेवी आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!