Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टशी छेडछाड करणाऱ्या डॉक्टरांना अटक

पुण्यात पोर्शे कारनं दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दिलेला जामीन पुण्याच्या बाल न्याय मंडळानं रद्द केला आहे. या अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिला आहे.या प्रकरणात डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करून चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप या डॉक्टरांवर आहे. या प्रकरणात पोर्शे कारनं दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दिलेला जामीन पुण्याच्या बाल न्याय मंडळानं रद्द केला होता. या अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिले होते.22 मे रोजी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या वडिलांसह नितेश शेवानी आणि जयेश गावकरे या बारमालक आणि व्यवस्थापकांनाही तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय.कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. त्यानंतर त्यांना 22 मे रोजी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.शनिवारी (18 मे) पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत कार चालवत, दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत.

या घटनेनंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावर न्यायालयानं काही अटी घालत जामीन मंजूर केला. या अटींवरुन जनक्षोभ उसळलेला दिसून आला होता.त्यानंतर या प्रकरणी मुलाचे वडील आणि तो ज्या पबमध्ये दारु प्यायला होता, त्या ठिकाणच्या मॅनेजर, तसंच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून, त्यांना काल (21 मे) अटक करण्यात आली.वयाची खात्री न करता मुलाला दारू दिल्याप्रकरणी पबच्या कर्मचाऱ्यांवर आणि अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्याप्रकरणी वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.कल्याणीनगर जवळ दोन पबमध्ये जाऊन या मुलानं दारु प्यायली होती, हे एफआयआरवरून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर रात्री उशिरा परवाना नसताना बेदरकारपणे कार चालवत त्यानं पल्सरवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टशी छेडछाड केल्याचा आरोप नोंदवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावडे आणि डॉ. हरी हरनोर या दोन डॉक्टरांना या घटनेचा तपास करणाऱ्या पुणे गुन्हे शाखेनं अटक केली.डॉक्टरांचे फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासावरून डॉ. तावडे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील यांच्यात फोनवरून बोलणं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.अपघात झाला तेव्हा कार अल्पवयीन आरोपी चालवत होता. त्याच्या रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यात त्यानं दारू प्यायली नव्हती असा उल्लेख होता. पण प्रत्यक्षात तो मुलगा एका पबमध्ये दारू घेत असल्याचं सीसीटिव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरांना अटक केली आहे.

अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलानं करड्या रंगाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली.एफआयआरमधील माहितीनुसार, हा अपघात झाला, त्यावेळी या मुलाबरोबर त्याचे काही मित्रही होते.शनिवारी (18 मे) रात्री उशिरा 10 ते 12 ते सगळे पार्टी करण्यासाठी पुण्यातील मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दारुचं सेवन केलं. पण एवढ्यावरच त्या सगळ्यांची पार्टी संपली नाही.यानंतर रात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान हे सगळे तरुण मुंढवा परिसरामध्येच असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्याठिकाणीही या सगळ्यांनी दारु प्यायली होती, असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.त्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास करड्या रंगाच्या एका महागड्या कारमधून जात असताना दुचाकीला त्यांनी धडक दिली. त्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.या कारच्या दोन्ही बाजूलाही नंबर प्लेट नसल्याचा उल्लेखही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे, तर कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीचं वय 17 वर्षे 8 महिने असल्याचाही यात उल्लेख आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!