आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे. अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये.शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एनसीपीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल. पण भरत गोगावले यांनी मुंबई हासकोर्टात ६ ॲागस्ट तारीख घेतलीय. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावं लागेल. सप्टेंबर अखेर पर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे. म्हणून ते हायकोर्टात गेले आहेत, अशी माहिती ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एनसीपीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल. पण भरत गोगावले यांनी मुंबई हासकोर्टात ६ ॲागस्ट तारीख घेतलीय. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावं लागेल. सप्टेंबर अखेर पर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे. म्हणून ते हायकोर्टात गेले आहेत, अशी माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालायत सुनावणी झाली. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना अपात्र करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची याचिका आहे. यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड दिल्लीत आहेत. ते या सुनावणीला उपस्थित होते.