(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बकरी विकण्यावरून झालेल्या भांडणानंतर मुलाने स्वतःच्या आईला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील बचरा गावात झाली. बकरे विकण्यावरून झालेल्या भांडणात एका ५० वर्षीय महिलेची तिच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत कमलेश देवी यांच्या मुलाने शुक्रवारी रात्री त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्याने जीवंत जाळले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिचा मुलगा किशून बिहारी यादव याने तिला कपड्यांखाली लपवले आणि तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेऊन आग विझवली, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेचा मुलगा किशून यादव याला अटक केली आहे. कमलेश देवी या घरात मुलगा आणि सुनेसह राहत होता आणि बकरी विकण्यावरून तिचा मुलासोबत वाद झाला होता.