Latest Marathi News
Ganesh J GIF

विना नंबर प्लेटची गाडीला वाहतूक पोलिसानी थांबविले ; रागात चालकाने पोलीस हवालदाराला नेले फरफरटत

पुणे – सिग्नल बंद असताना विना नंबर प्लेटची गाडी येऊन येणार्‍या मोटारसायकलचालकाला वाहतूक पोलीस हवालदारांनी थांबविले. गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याने गाडी रेस केली. हवालदाराने त्याच्या दंडाला पकडले असतानाही त्यांना चालकाने १०० मीटर फरफरटत नेऊन दुखापत केली. पोलिसांनी ऋतिक प्रकाश हिंगणे याला अटक केली आहे.

ही घटना हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट कडील रोडवर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत वाहतूक पोलीस हवालदार चेतन सुलाखे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर वाहतूक विभागात डायव्हर्जन बंदोबस्तासाठी सकाळी ९ पासून कामावर उपस्थित होते. हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटकडून येणार्‍या मार्गावरुन येणार्‍या वाहनांना मागेच थांबवून त्यांना मगरपट्टा ब्रीजखालून वळून मुख्य रस्त्यावर येण्याबाबत सुचना देण्याकरीता तसेच त्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्याचे काम ते करत होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हडपसरच्या दिशेने जाणारी वाहने सिग्नल लागल्याने थांबली होती. त्यावेळी एक मोटारसायकलस्वाराच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती.

फिर्यादी यांनी त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याला गाडी नंबर व लायसनची मागणी केली. त्याने लायसन नसल्याचे सांगितले. पाठीमागे बसलेली तरुणी मोटारसायकलवरुन उतरली. त्याने गाडी बाजूला घेतो, असे सांगून लगेच चावी लावून गाडी स्टार्ट केली़ व पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्या दंडाला पकडले. त्यास थांबण्याची विनंती केली. तेव्हा त्याने मोटारसायकल रेस करुन फिर्यादी यांना ९० ते १०० मीटर फरफरटत नेले.  त्यामुळे त्यांच्या गणवेशावरील पँट फाटून दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. त्यांचा बुट फाटला. काही अंतर गेल्यावर त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने त्याने मोटारसायकल थांबविली. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक खांडे तसेच पोलीस अंमलदार आगाव, राठोड व इतर जण मदतीसाठी धावत आले. त्याने हिंगणे याला पकडले. या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हत. तसेच तिचा इन्शुरन्सही भरला नसल्याचे आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!