Latest Marathi News
Ganesh J GIF

विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून तरुणाचा अश्लिल हावभाव; जाब विचारताच टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण

एरंडवणे येथील अखिल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून अश्लिल हावभाव करणार्‍याला जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी शिवम प्रसाद मारणे (वय २४) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओमकार वेडे, श्रीकांत कदम, आकाश मापारी, शुभम चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विसर्जन मिरवणुकीत १८ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मी रोडवरील कजरी चौकात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणा येथील अखिल गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुक लक्ष्मी रोडवरील कजरी चौकात आली होती. त्यावेळी ओमकार वेडे हा ट्रॅक्टरवर उभा राहून फिर्यादी यांच्याकडे पाहून घाणेरडे इशारे करु लागला. फिर्यादी यांनी असे घाणेरडे इशारे का करत आहे, असा जाब विचारला. त्यावर त्याचे मित्र आकाश, श्रीकांत, शुभम यांनी वाद घालून फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ तन्मय यांना मारहाण केली. आकाश मापारी यांने फिर्यादी यांना मागे ओढत घेऊन गेला. त्यांच्याकडील लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. ओमकार वेडे हा सुद्धा खाली उतरुन त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस हवालदार माने तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!