धक्कादायक ! पुण्यात जुन्या वादातुन बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांची वार करुन हत्या
जुन्या वादातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
बाळासाहेब रणदिवे (वय २८) हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. बहुजन शक्ती सेनाचे ते अध्यक्ष होते. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता मार्केटयार्ड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब रणदिवे हे मार्केटयार्ड येथे थांबले असताना चौघे जण तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून बाळासाहेब रणदिवे यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब रणदिवे यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे.