Latest Marathi News
Ganesh J GIF

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपणार ; डिसेंबरचा हप्ता मिळणार ‘या’ दिवशी

राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची चर्चा सुरु आहे. सद्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून महायुती आपल्या प्रचारात लाडकी बहिणीचा प्रमुख मुद्दा म्हणून वापर करत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत पैसे येण्यास सुरूवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे अॅडव्हांस पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे, ते म्हणजे डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? याकडे..

या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे.लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार टीका सुद्धा केली. उद्धव ठाकरे मला म्हणाले, दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो, लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे . विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही, निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता खात्यामध्ये जमा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!