Latest Marathi News
Ganesh J GIF

“मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार”, एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश तर मिळालं, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी नाराज आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यास मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वापर्यंत पोहचवला असल्याची बातमी समोर आली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते.महायुतीत सामील असलेल्या एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता,असेही भाजपकडून सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे.एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल होत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्या किंवा केंद्र सरकारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या मुलाला म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना राज्य सरकारमध्ये पाठवा, असे दोन प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे हे प्रस्ताव धुडकावलयाची माहितीही समोर आली आहे. भाजपच्या दोनही ऑफर्स धुडकावल्यानंतर ही एकनाथ शिंदे कोणाशीही भेटीगाठी घेण्याचेही टाळत असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळत भाजपचा प्रस्ताव अमान्य केला. पण त्याचवेळी त्यांनी भाजपला त्यांच्याकडून दुसरा प्रस्ताव पाठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पण भाजपनेही एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेनी सरकारमध्येच राहावं अशी भाजपची इच्छा आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडशी चर्चा सुरू आहे. राज्यात नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!