Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी..! विरोधकांची मागणी अखेर मान्य ; महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघामध्ये फेर मतमोजणी होणार

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी आता मान्य झाली आहे.

सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत.सीमा हिरे यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना ७३ हजार ६५१ मते मिळाली आहेत.

ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतला आहे. त्यामुळं औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्र (ईव्हीएम) सील करण्यात आली आहे. ही यंत्रे आता ४५ दिवस सील राहणार आहे. एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतल्यास न्यायालयान प्रक्रियेसाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे राज्यभरातील मतदान यंत्रे ४५ दिवसांपर्यंत सील राहणार आहे. मतदान यंत्रासह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट सील करुन गोदामात ठेवली आहे

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!