Latest Marathi News
Ganesh J GIF

सतीश वाघ यांची हत्या करायचीच नव्हती पण…

सतीश वाघ हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर, मोहिनी वाघ यांचे धक्कादायक खुलासे, म्हणाल्या...

पुणे – भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणात मामी मोहिनी वाघ यांना पोलीसांनी अटक केली आहे. यावेळी चाैकशीत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. मोहीनी वाघ यांनी सुरूवातीला सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध असल्याचा दावा केला होता. पण आता मोहिनी वाघ यांनी नवीन दावा केला आहे.

सतीश वाघ यांची हत्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे करण्यात आली होती. पण आता मोहिनी वाघ यांच्या चाैकशीत नवीन माहिती समोर येत आहे. सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याचे होती. हात पाय तुटल्यानंतर ते घरात बसतील, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील त्यानंतर कोणाचाही अडसर राहणार नाही, असा मोहिनी वाघ यांचा प्लॅन होता. त्यामुळे मारेकऱ्यांना देण्यात आलेली सुपारी ही फक्त सतीश वाघ यांना जायबंदी करण्यासाठी देण्यात आलेली होती. पण अपहरण केल्यानंतर मारेकऱ्यांना सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याचे समजले. ही बाब समजताच मारेकरी घाबरले. त्यामुळे सतीश वाघ यांच्यावर ७२ वार करुन त्यांची हत्या करण्यात आली.

सतीश वाघ हत्या प्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते. त्यांची हत्या करण्यासाठी मोहिनी वाघने गेल्या सहा महिन्यांपासून तयारी केली होती. आरोपी मोहिनी, जाधव आणि यापूर्वी अटक केलेले आरोपी या सर्वांचा एकत्रित तपास करायचा असल्याने आता सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!