Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार गट ‘या’ दिवशी एकत्र येणार?

अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार? शरद पवार घेणार राजकीय संन्यास?

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन गटात विभाजन झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठे यश मिळाले तर अजित पवार गटाचा फक्त एक खासदार निवडून आला. पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवार गटाने विजयाबरोबर सत्ता देखील मिळवली. त्यामुळे शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणूकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे पानीपत झाले. महसूती २३२ तर महाविकास आघाडी अवघ्या ४६ जागा जिंकू शकली. त्यातच अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या, तर शरद पवार गटाला अवघ्या १० जागा मिळाल्या. त्यामुळे शरद पवार गटातील आमदार खासदार प्रचंड अस्वस्थ आहेत. सत्ता नसल्याने पुढील ५ वर्षे मतदारसंघातील विकासकामे होणार नाहीत. मग पुढच्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे त्यापेक्षा आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करून एकच राष्ट्रवादी जोमाने वाढवावी अशी भुमिका शरद पवार गटातील नेत्यांनी घेतली आहे. पण शरद पवार मात्र अजित पवार आणि पर्यायाने भाजपासोबत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे अजित पवारांसोबत जाण्यास इच्छुक नेत्यांनी सुप्रिया सुळे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाच्या ८ आणि ९ जानेवारीला होणाऱ्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. तिकडे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनीही आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन कुटुंब एक होऊ दे, असे साकडे घातले आहे. त्यामुळे हा महिना अनेक राजकीय घडामोडीचा असणार आहे.

जितेंद्र आव्हाड, राेहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र अजित पवार यांच्यासोबत जाण्यास विरोध आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!