Latest Marathi News
Ganesh J GIF

वाल्मिक कराडची प्रकृती पोलीस स्टेशनमध्ये अचानक खालावली

वाल्मिक कराडची बडदास्त ठेवली जात असल्याचा विरोधकांचा आरोप, पोलिसांचा इन्कार, नक्की काय घडतयं?

बीड – राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला केज न्यायालयाने १५ दिवसांची सीआयडी कोठडी सूनावली आहे. पण अचानक कराडची तब्येत खालावल्याने त्याला आॅक्सीजनवर ठेवावे लागले होते.

वाल्मिक कराड याची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याला ऑक्सिजन लावण्यात आले. त्यानंतर त्याला बरे वाटले. पण महत्वाचे म्हणजे कराडला बीड पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात पाच नवीन पलंगांची व्यवस्था करण्यात आली. या पलंगांची व्यवस्था आरोपींसाठी करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी ही व्यवस्था स्वतःसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.” असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा आणि देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिस आणि सीआयडी वाल्मिक कराडवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाल्या नंतर या हत्याकांडाशी खंडणी प्रकरण सबंधित असून त्या दिवसापासून वाल्मीक कराड फरार होता. आता सीआयडीने आपला मोर्चा आरोपी सुदर्शन घुलेकडे वळवला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!