
अनैतिक संबंधात अडथळ्या ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या
प्रियकरासोबत मिळून दिली होती दीड लाख रूपयांची सुपारी, असा झाला खुलासा, पोलिसही चकित
इंदूर – मध्य प्रदेशातील इंदूर येथे २७ डिसेंबरला होमोओपॅथी डॉक्टर सुनील साहू हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. डाॅक्टर साहूंची हत्या त्यांची पत्नी सोनाली आणि तिचा प्रियकर वकील संतोष शर्मा यांना केल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.
सोनालीचे सुनिल साहु यांच्याशी दीड वर्षापुर्वी लग्न झाले होते. पण ती या लग्नाला तयारी नव्हती. त्यामुळे ती नाखुश असायची. तिचे लग्नाआधी संतोष शर्माबरोबर संबंध होते. एके दिवशी सोनाली आणि संतोषचे व्हॉट्सअप चॅट पतीने पाहिले होते. तेव्हापासून पत्नी सोनालीसोबत त्याचे वाद सुरू होते. या वादातूनच सोनालीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचं ठरवलं. गेल्या ८ महिन्यापासून ती याचे नियोजन करत होती. त्यातून त्यांनी साहूंची हत्या करण्यासाठी दीड लाख रूपयांची सुपारी दिली होती. घटनेच्या दिवशी म्हणजे २७ डिसेंबरला रात्री १० च्या सुमारास डॉक्टर सुनील साहू यांच्या कुंदन नगर येथील जीवनधारा दवाखान्यात रुग्ण बनून आलेल्या तिघांनी वेळ साधून डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलीसांनी तपास सुरु केला असता त्यांना सोनालीवर संशय होता. त्यामुळे पोलीसांनी तिला अटक केली. तिला पोलीसी खाक्या दाखवताच तिने सगळा घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर पत्नी, तिचा प्रियकर यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून देशी कट्टाही जप्त केला आहे.
अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. सुरूवातीला याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आता खुलासा झाल्यानंतर कडक शासन करण्याची मागणी होत आहे.