Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाच्या वाढदिवसादिवशीच दांपत्याची आत्महत्या

दाम्पत्याने 'या' कारणाने संपवले जीवन, व्हाट्सॲप स्टेटसला ठेवला व्हिडिओ आणि...

नागपूर – नागपूर शहरात एक दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवसादिवशीस पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. नागपूरमधील मार्टीननगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली आहे.

जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. तसेच पोलिसांना त्यांच्या घरात एक सुसाइड नोट देखील आढळली आहे. जारील आणि ॲनी या दोघांचा प्रेम विवाह होता. पण, मुल होत नसल्याने दोघेही नैराश्यात होते. कोरोना काळात जारील यांची नोकरी गेली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते. काम नसल्याने दोघेही उदास राहत होते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून गेले तरी जारील यांच्या घरातून कोणी बाहेर आले नाही. म्हणून शेजारच्या एका महिलेने त्यांना आवाज दिला. परंतु कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्या महिलेने खिडकीतून आत डोकावून बघितले. तेव्हा त्यांना समोर पती-पत्नी गळफास घेतलेला दिसून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टोनी आणि ॲनी गेल्या दोन महिन्यांपासून आत्महत्या करण्याच्या विचारात होते. दोघांनी देखील लग्नाच्या वाढदिवशीच आपले जीवन संपवण्याचा निश्चय केला होता. लग्नाच्या दिवशी दांपत्याने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!