
सावधान! महाराष्ट्रात टक्कल व्हायरलचा शिरकाव
तीन दिवसात पडतय टक्कल, पुरूषांबरोबर महिलांनाही होतोय त्रास, डाॅक्टर म्हणतात....
बुलढाणा – देशात कोरोनाचे थैमाने सर्वांनी पाहिले आहे. त्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत. असे असताना आता देशात नवीन HMPV व्हायरलचा धोका वर्तवला जात आहे. पण त्याआधी महाराष्ट्रात मात्र टक्कल व्हायरलने धुमाकूळ घातला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. यामध्ये केस गळती होऊन तो माणूस पूर्णपणे टकला होत आहे. त्यामुळे या आजाराला टक्कल व्हायरल म्हटले जात आहे. शेगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये ‘टक्कल व्हायरस’ पसरल्याचे बोलले जात आहे. या तीन गावांमधील लोकांमध्ये अचानक केसगळती सुरू झाली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा, या गावांमध्ये या अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत विशेष म्हणजे महिलांना देखील हा आजार होत आहे. सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हातात येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने लोक घाबरून गेले आहेत. गावकऱ्यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार दिली असून आरोग्य पथक तपासणीसाठी गावात पोहोचल आहे. दरम्यान गावातील काही लोक केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत.
गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचं कारण दूषित पाणी असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर परिणामकारक उपचार केले जातील असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.