Latest Marathi News
Ganesh J GIF

“धनंजय मुंडे हे म्हणजे पुरुष वेश्या”

मुंडेंवर टिका करताना या आमदाराची जीभ घसरली, अजित पवार, फडणवीसांवरही घेतले तोंडसुख

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मुंडे यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

धनंजय मुंडेंवर टीका करताना उत्तम जानकर म्हणाले की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची वेळ का येत आहे? हे राज्य अत्यंत नैतिक होतं. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांनी एक चुकीचा शब्द गेला म्हणून नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलेला होता. धनंजय मुंडे यांनी तर रानबाजार मांडला आहे. यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप आहेत. स्त्री वेश्या असल्याचं आपण पाहिलं, मात्र पुरुष वेश्या असल्याचं दिसत आहे. राज्यातील मंत्रीच जर असे वागत असतील आणि अजित पवार असे सरकार चालवत असतील तर राज्याने त्यांच्याकडून काय घ्यायचं”,असा सवाल उत्तम जानकर यांनी केला आहे.” धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असतं, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता. गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे. सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊनच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे”, असेही जानकर यांनी म्हटले आहे. दरम्यान उत्तम जानकर यांनी केली आहे. मात्र टीका करताना त्यांचा तोल गेल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचा उजवा हात मानला जाणारा वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र मुंडे यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!