Latest Marathi News
Ganesh J GIF

एसटी महामंडळात दोन हजार कोटींचा कंत्राट घोटाळा?

फडणवीसांचे चाैकशीचे आदेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढणार, महायुतीत तणाव?

मुंबई – राज्यात दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर आता राज्य परिवहन मंळडाच्या १३१० बसच्या खरेदी प्रकरणावर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिवहन महामंडळाने १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा दाखल केली होती. एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रचलित पद्धत मोडून विभागनिहाय गाड्या घेण्याऐवजी विभागाला तीन समुहात विभागून प्रत्येक समूहात ४०० ते ४५० याप्रमाणे १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला. या व्यवहारात परिवहन मंडळाला दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियांमध्ये सात वर्षांसाठी या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने २००० कोटींचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार. आता या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्यात आली आहे. करारामध्ये २०२२मध्ये ४४ रुपये प्रति किमी दराने ५०० गाड्या भाडेतत्वावर देण्यात आल्या होत्या. निविदेत डिझेल खर्च वगळून ३९ ते ४१ रुपये प्रति किमी दर ठरवण्यात आला. डिझेल खर्च प्रति किमी २० ते ३० रुपये असल्याने एसटीवर भार आला. मागच्या निविदेच्या तुलनेत प्रति किमी १२ रुपये अधिक भार येत असल्याचं समोर आले आहे. याबाबत बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्यण घेतलाय त्याबाबत मला फार काही माहिती नाही. पण चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही. महामंडळा आणि राज्य सरकारच्या हिसातासाठी आणि प्रवाशांनाही फायदेशीर ठरतील असेच निर्णय घेतले जातील त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

ठेकेदारांसाठी निविदेतील अटी -शर्ती बदलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांचीच बदली करण्यात आली आणि निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दरम्यान यामुळे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!