Latest Marathi News
Ganesh J GIF

 “मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!” एमपीएससी चौकशी आयोगावर तुकाराम मुंढेंचे मोठे स्पष्टीकरण

     महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) गैरकारभारामुळे सध्या राज्यात मोठा गोंधळ उडाला आहे. औषध निरीक्षक भरती परीक्षेत खुद्द आयोगातीलच अधिकारी आरोपी निघाल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच औषध निरीक्षक भरती प्रकरणातील आरोपी ज्या कालावधीत कार्यरत होते, त्या काळात पार पडलेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एक चौकशी आयोग नेमून सर्व आजी-माजी सदस्य व अध्यक्षांची चौकशी केली जाईल, असा शब्द आंदोलक विद्यार्थ्यांना दिला होता.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयोगाच्या सर्व संशयित परीक्षांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यासाठी पाच सदस्यांचा आयोग स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले, तर सचिवपदी तुकाराम मुंढे असतील; तसेच पोलीस अधिकारी लखमी गौतम, माजी सनदी अधिकारी गणेश पाटील आणि माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक हे सदस्य असतील, असे सांगण्यात आले होते. हा चौकशी आयोग ६० दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!