Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या या आमदाराची राजकारणातून निवृत्ती

जातीपातीवर निवडणूका होत असल्याने व्यक्त केली नाराजी, विकास करूनही कमी मताधिक्य मिळाल्याने निवृत्ती

सिल्लोड – शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदारअब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली. त्यामुळे सत्तार यांनी राजकीय निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे. पण त्यांच्या या घोषणेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार अब्दुल सत्तार मंत्रीमंडळातून वगळल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. पण आज त्यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली. ते म्हणाले जातीपातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहिल. यापुढं मी सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही. आमदार आणि मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीही न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मते मिळतात. विरोधक जातीपातीवर निवडणुका लढतात. हे राजकारण घातक आहे. जर विकासाला प्राधान्य दिले जात नसेल आणि फक्त जातीच्या आधारावर निवडणुका होत असतील तर आतापर्यंत मला निवडून दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो, परंतु मी आता सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीरला सांगितले की मी निवडणूक लढवणार नाही. तुला लढायची असेल तर बघ, तसेच हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असेही सत्तार म्हणाले आहेत. मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली व माझा विजय २४२० मतांनी झाला. लोकांना विकास नकोय असे म्हणत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा २४२० मतांनी पराभव केला होता. सत्तार यांनी १ लाख ३७ हजार ९६० तर बनकर यांना १ लाख ३५ हजार ५४० मते मिळाली होती. सत्तार सलग चारवेळा सिल्लोडमधून विजयी झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!