Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी होणार?

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, ही बाब अडचणीची ठरणार, फडणवीसांची कोंडी?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत असल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंना खिंडीत गाठण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. इतकेच नाही तर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा अशी मागणी करणारा ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला असून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहेत. याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले की, रामदास कदम म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासली, लाचारी पत्करून उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अजिबात अधिकार नसल्याचे ते म्हणाले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोअर टीममधील विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस सरकार आल्यावर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणीसाठी समिती गठित करण्यात आली होती.

सप्टेंबर २०१६ मध्ये फडणवीस सरकारने स्मारकासाठी विश्वस्त मंडळास मान्यता दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांची सदस्य सचिव म्हणून, तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण ही नियुक्ती ५ वर्षांसाठी होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!