मुंबई दि ५ (प्रतिनिधी) – पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुढील १५ दिवसाचा मुक्काम कोठडीतच राहणार आहे.
ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जवळचे प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. त्यांनी व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आली होती.तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे त्यांना ३१ जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २१ आॅगस्टच्या सुनावणीत त्यांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यात आज पुन्हा १९ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप केला होता.
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. या व्यवहारात राऊतांना लाभ झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.