Latest Marathi News
Ganesh J GIF

महिला मंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात, आमदारही जखमी

कुत्रा आडवा आल्याने अपघात, गाडीचा चक्काचुर, अपघातात महिला मंत्र्यांच्या पाठीला फ्रॅक्चर

बंगळुरू – कर्नाटकच्या बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी या विधिमंडळ पक्षाची बैठक आटोपून बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातामुळे त्यांच्या पाठीवर फॅक्चर झाले होते.

लक्ष्मी हेब्बाळकर या बेंगळुरूहून बेळगावला येत होत्या. त्यावेळी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टीजवळ रस्त्यावर अचानक त्यांच्या गाडीसमोर कुत्रं आडवं आलं. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कारची झाडाला जोरदार धडक बसली. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी या अपघातातून बचावले आहेत. मात्र कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ रवी पाटील यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले आहे. हेब्बाळकर यांच्या पाठीवर दोन ठिकाणी फॅक्चर झाले असून चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळीच्या यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांच्यासह सीपीआय शिवानंद व रामदुर्गचे डीएसपी चिदंबरम यांनी घटनास्थळी भेट देवुन जखमींना तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहकारी मंत्र्यांनी व निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांंनी फोनवरुन विचारपूस केली. तसेच, काही समर्थकांनी रुग्णालयाकडेही धाव घेतली. सुदैवाने सध्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची प्रकृती स्थिर आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!